Thursday, February 18, 2021
रोहित जाधव न्युज रिपोर्टर: नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने पंढरपूर मध्ये ...
नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने पंढरपूर मध्ये धर्मनाथ बीज सोहळा संपन्न
नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने पंढरपूर मध्ये धर्मनाथ बीज सोहळा संपन्न
अखिल भारतीय नाथ समाज नाथ संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पंढरपूर मध्ये धर्मनाथ बीज चे आयोजन दर वर्षी प्रमाणे करण्यात आले होते,हा सोहळा नाथपंथी डवरी गोसावी समाज यांच्या वतीने साजरा केला जातो,
माघ महिन्यातील द्वितीया, जिला धर्मबीज असें म्हणतात. या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे. या दिवशीं श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. व त्या वेळेस सर्व देवी देवतांना आमंञित केले होते. तसेच प्रयाग क्षेञातील सर्व नगरवासी लोकांचाहि मोठा मेळा जमला होता.यादिवशी भव्य अन्नदान (भंडारा)झाला व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता. यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला. व देवांसह सर्वांनी दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी ईच्छा प्रगट केली. श्री गोरक्षनाथांनी "धर्मनाथबीजेचा" उत्सव प्रतिवर्षीं करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हां सर्वास आनंद झाला व दरसाल या दिवशीं उत्सव होऊं लागला.
नवनाथांचे महत्त्व या बीज च्या माध्यमातून समजून येते, नऊ दिवस पारायण गोरक्षनाथांची पूजा, नवनाथांची आरती केली जाते,तसेच सांस्कृतिक कार्यक्रम,भारुडी,नृत्य, कला सादरीकरण शाहीर,जागरण गोंधळ असे विविध कार्यक्रम येथे केले जातात आणि शेवटच्या दिवशी महाआरती,फुलेवाहूने,महाप्रसाद करून या बिजची समाप्ती होते,
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्यातील आमदार, नगराध्यक्षा तसेच अखिल भारतीय नाथ संघटनेचे सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि नाथ बांधव,पंढरपूर मधील डवरी समाज आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,या वेळी नाथ संघटनेमध्ये प्रवेश केलेल्या अनेक नाथ बांधवांना नियुक्ती पत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
Wednesday, February 17, 2021
सांगली मध्ये धर्मनाथ बीज पारायण सोहळा संपन्न
आजच्या दिवसाला धर्मनाथ बीज म्हणून संबोधले जाते, माघ महिन्यातील द्वितीया, जिला धर्मबीज असें म्हणतात. या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे. या दिवशीं श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. व त्या वेळेस सर्व देवी देवतांना आमंञित केले होते. तसेच प्रयाग क्षेञातील सर्व नगरवासी लोकांचाहि मोठा मेळा जमला होता. यादिवशी भव्य अन्नदान (भंडारा)झाला व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता. यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला. व देवांसह सर्वांनी दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी ईच्छा प्रगट केली. श्री गोरक्षनाथांनी "धर्मनाथबीजेचा" उत्सव प्रतिवर्षीं करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हां सर्वास आनंद झाला व दरसाल या दिवशीं उत्सव होऊं लागला. गोरक्षनाथानें आपल्या 'किमयागिरी' नामक ग्रंथांत असें लिहिलें आहे कीं. आपापल्या शक्त्यनुसार जो कोणी हें बीजेचें व्रत करील त्याच्या घरीं दोष, दारिद्र्य, रोग आदिकरुन विघ्नें स्वप्नांत देखील यावयाची नाहींत. त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल. प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या गृहीं वास्तव्य करील. याप्रमाणें हा धर्मनाथ बीजेचा महिमा होय.
आज विद्यानगर,विश्रामबाग,सांगली मध्ये नाथपंथी डवरी समाजाच्या वतीने धर्मनाथ बीज आणि पारायण सोहळा मोठ्याने संपन्न झाला, श्री योगी ओमकारणाथ महाराज कुंडल यांच्या उपस्थित नवनाथांची पूजा करून नऊ मुलांना जेवण खावू घालून आजची पूजा व आरती करून कार्यक्रम पार पडला,दर वर्षी येथे हा कार्यक्रम घेण्यात येतो,
या प्रसंगी मछिंद्रनाथ बामणे,अंबरनाथ बामणे,रोहित जाधव,संतोष बामणे,सागर बामणे,जितेंद्र कोष्टी,अंकुश डवरी नाथ महाराज, शंतिनाथ जाधव,आदिनाथ जाधव,उमेश कदम,सुभाष जाधव, सौ.शारदा जाधव,सौ दिपाली बामणे,मंगल बामणे,शांता बामणे,स्वाती हिंगमिरे यासह अनेक नाथ बांधव आणि नागरिक उपस्थित होते.
बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना
एकीकडे भाऊ-बहिणीचे नाते भक्कम करणारा सण म्हणजे रक्षाबंधन असताना, मात्र दुसरीकडे भाऊ बहिणाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे...
-
आजच्या दिवसाला धर्मनाथ बीज म्हणून संबोधले जाते, माघ महिन्यातील द्वितीया, जिला धर्मबीज असें म्हणतात. या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आह...
-
रोहित जाधव न्युज रिपोर्टर: नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने पंढरपूर मध्ये ... : नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने पंढरपूर मध्ये धर्मनाथ...
-
नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने पंढरपूर मध्ये धर्मनाथ बीज सोहळा संपन्न अखिल भारतीय नाथ समाज नाथ संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पंढरपू...





